आर्श्चयकारक! परदेशातून फिरायला आली आणि    
 भारतीय ऑटो चालकाच्या प्रेमात पडली

आर्श्चयकारक! परदेशातून फिरायला आली आणि भारतीय ऑटो चालकाच्या प्रेमात पडली

कर्नाटकातील अनंतराजू आणि बेल्जियममधील कॅमिल यांची प्रेम कहाणी सध्या चर्चेत आहे. दोघांनी २५ नोव्हेंबर 2022 रोजी हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले
Published by :
shweta walge

कर्नाटकातील अनंतराजू आणि बेल्जियममधील कॅमिल यांची प्रेम कहाणी सध्या चर्चेत आहे. दोघांनी २५ नोव्हेंबर 2022 रोजी हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. ३० वर्षीय अनंतराजू ऑटो चालवतात आणि टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो २७ वर्षीय कॅमिलच्या प्रेमात पडला होता.

रिपोर्टनुसार, अनंतराजू यांची कॅमिलसोबत पहिली भेट 2019 मध्ये झाली होती. त्यानंतर कॅमिल तिच्या कुटुंबासह हम्पीला भेट देण्यासाठी आली होती. त्यावेळी अनंतराजू यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. सोबतच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या भारत दौर्‍यादरम्यान, अनंतराजू यांच्या प्रामाणिकपणाने आणि आदरातिथ्याने हे कुटुंब खूप प्रभावित झाले.

अशा परिस्थितीत, आपल्या देशात परतल्यानंतर, कॅमिल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूंच्या संपर्कात राहिली आणि त्यांच्याशी सतत बोलत राहिली. दरम्यान, दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. पण कोरोना महामारीमुळे भेट होऊ शकली नाही. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी आपापल्या कुटुंबियांना त्यांच्या 'लाँग डिस्टन्स लव्ह'बद्दल सांगितले. याला दोन्ही कुटुंबीयांचा कोणताही आक्षेप नव्हता. त्यांनी या जोडप्याला लग्नाला होकार दिला. अखेर गेल्या शुक्रवारी दोघांचा विवाह झाला.

अनंतराजू सांगतात की, कॅमिल 2019 मध्ये तिच्या आई-वडील आणि भावंडांसोबत हम्पीला आली होती. हंपीला तो पहिल्यांदाच आलो असल्याने त्याला इथल्या राहण्याची आणि जेवणाची काळजी वाटत होती. पण त्यांना राहण्यासाठी सर्वोत्तम हॉटेल मिळेल याची मी खात्री केली. माझ्या व्यवस्थेमुळे कुटुंब आनंदी झाले आणि त्यांनी मला वचन दिले की ते पुन्हा हम्पीला भेट देतील. दरम्यान, अनंतराजू आणि कॅमिलचे सोशल मीडिया आणि फोनवरून बोलणे सुरू झाले.

अनंतराजूच्या म्हणण्यानुसार, आम्ही काही दिवसांतच एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही गेल्या वर्षीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण कोरोनामुळे ते लांबले. मात्र, आता आमचे लग्न झाले आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार आमचे लग्न झाले. लग्नासाठी कॅमिलचे जवळपास 40 नातेवाईक आणि मित्र हम्पी येथे आले होते. तो माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप छान क्षण होता. प्रेमाला सीमा नसते हे माझ्या लग्नाने सिद्ध केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com