RBI JE Recruitment 2023 : रिझर्व बँकेत नोकरीची संधी; महिन्याला मिळेल तब्बल 33 हजार पगार, आताच करा अर्ज

RBI JE Recruitment 2023 : रिझर्व बँकेत नोकरीची संधी; महिन्याला मिळेल तब्बल 33 हजार पगार, आताच करा अर्ज

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ९ जूनपासून सुरू झाली आहे.

RBI JE Recruitment 2023 : बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ९ जूनपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार आरबीआय कनिष्ठ अभियंता भरतीसाठी 30 जून किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी निवड लेखी चाचणी आणि एलपीटीच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा १५ जुलै रोजी होणार आहे.

पात्रता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ अभियंता पदांवर भरतीसाठी किमान वय 20 आणि कमाल वय 30 निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथिल केली जाईल. याशिवाय उमेदवाराकडे सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असावी.

पगार

अधिकृत माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कनिष्ठ अभियंत्यांच्या 35 रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या 29 आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) च्या 6 पदांचा समावेश आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 33,900 रुपये वेतन दिले जाईल.

कसा कराल अर्ज?

पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर 30 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अधिकृत वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करावा. यासाठी सामान्य/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही हे लक्षात ठेवा. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट देखील तपासू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com