Ashadhi Ekadashi : मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांना 'या' खास मेसेजने द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi : मित्र-मैत्रीणी, नातेवाईकांना 'या' खास मेसेजने द्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोषाने वातावरण प्रसन्न होते. या आषाढी एकादशीला सुंदर मेसेजेसने आपल्या हिंतचिंतकांना शुभेच्छा द्या.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Ashadhi Ekadashi Special : पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोषाने वातावरण अगदी प्रसन्न होते. सर्व सुख-दुःखे विसरून वारकरी पांडुरंगाच्या ओढीने आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. सावळ्या विठुरायाचे मनमोहक रुप सर्वच जण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अधीर असतात. या आषाढी एकादशीला सुंदर मेसेजेसने आपल्या हिंतचिंतकांना शुभेच्छा द्या.

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू दिसतो सावळा, कपाळी चंदनाचा टिळा

आम्हा वारकर्‍यांना लागला देवा तुझ्या भक्तीचा लळा

विठ्ठल विठ्ठल

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |

करावा विठ्ठल जीवभाव ||

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जरी बाप साऱ्या जगाचा परि तू

आम्हा लेकरांची विठू माऊली...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग…

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com