बैलपोळ्यानिमित्त खास शुभेच्छा शेअर करून साजरा करा बळीराजाचा सण

बैलपोळ्यानिमित्त खास शुभेच्छा शेअर करून साजरा करा बळीराजाचा सण

शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत बैलपोळा या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिनी व्हॉटस् अ‍ॅप स्टेटस किंवा मेसेजद्वारे सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा द्या.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Bail Pola 2023 : शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत बैलपोळा या सणाला विशेष महत्त्व आहे. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. या दिनी व्हॉटस् अ‍ॅप स्टेटस किंवा मेसेजद्वारे सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या शुभेच्छा द्या.

सण आला आनंदाचा,

माझ्या सर्जा राजाचा,

ऋणं त्याचे माझ्या माथी,

सण गावच्या मातीचा,

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

आला आला रे बैल पोळा

गाव झालं सारं गोळा,

सर्जा राजाला घेऊनी

सारे जाऊया राऊळा,

बैलपोळा सणाच्या

हार्दिक शुभेच्छा.!!

जसे दिव्याविना वातीला,

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,

तसेच कष्टाविना मातीला आणि

बैलाविना नाही शेतीला पर्याय,

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,

दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,

आज शांत निजू दे..

तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,

तुझ्या डोळ्यात सजू दे..

बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com