भोगी, संक्रांत आणि किंक्रांत; जाणून घ्या यांचे महत्व

भोगी, संक्रांत आणि किंक्रांत; जाणून घ्या यांचे महत्व

वर्षातील पहिल्या सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते.
Published by :
Siddhi Naringrekar

वर्षातील पहिल्या सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते. यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा, विशेष गंगास्नान, दान धर्म केला जातो. महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते. संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत.

भोगी - मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या सण संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधले जाते. पंजाबमध्ये हा सण ‘लोहिरी’ म्हणून साजरा करतात. नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवी पिकेदेखील येत असतात. म्हणूनच यादिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी करण्यात येते.

संक्रांत - सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो.या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात; विविध वस्तूंचेही वाण या दिवशी लुटले जाते. एक एकमेकांना तिळगुळ वाटतात. संपूर्ण भारतात संक्रांतीचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

किंक्रांत - संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. सर्वसाधारणपणे हा दिवस अशुभ मानला जातो. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com