Good Friday
Good Friday

आज जगभर गुड फ्रायडे का करतात साजरा?

गुड फ्रायडेचं ख्रिश्चन समाजात मोठं महत्व
Published by :
Team Lokshahi

आज जगभर गुड फ्रायडे (Good Friday) साजरा केला जात असून गुड फ्रायडेचं ख्रिश्चन (Christians)समाजात मोठं महत्व आहे. या दिवशी ख्रिश्चन समाज येशू ख्रिस्ताच्या (Jesus Christ) स्मरणार्थ हा दिवस साजरा (Celebrate) करतात.आज जगभरातील चर्चमध्ये (Church) धार्मिक प्रार्थना (Prayer) सभांचं आयोजन करण्यात आलं असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळं गुड फ्रायडेवर निर्बंध होते. या वर्षी कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले असल्यानं गुड फ्रायडे मोठ्या प्रमाणात होणार आहे.

गुड फ्रायडे म्हणजेच शुक्रवारच्या दिवशीच येशू ख्रिस्तांना सुळावर लटकवण्याचे आदेश रोमच्या राजाने दिले होते व त्यांच्या बलिदानाचे स्मरण या दिवशी केलं जातं.येशूने आपले सगळे जीवन समाजातील दुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलं असून ते नेहमी जगाला प्रेम आणि करुणाचा संदेश देत असे.गुड फ्रायडे हे इस्टर संडेच्या ( Easter Sunday) आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातोय. गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, त्याला इस्टर संडे म्हटलं जातं असून या दिवशी येशू पुन्हा जीवंत होऊन 40 दिवस लोकांच्यात जाऊन त्याने संदेश दिला असं सांगितलं जातंय. येशूच्या पुन्हा जिवंत होण्याच्या दिवसाला इस्टर संडेच्या रुपात साजरे केले जात असे. जगभरातील ख्रिश्चन बांधवांकडून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते व बायबलच्या (Bible)अंतिम सात वाक्यांचे स्मरण करण्यात येते.

या दिवशी कोणताही आनंददायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. ख्रिस्ती भाविक बांधव काळे कपडे घालून चर्च मध्ये येशुने केलेल्या बलिदानाबद्दल प्रार्थना ,कृतज्ञता व्यक्त करतात.जगभरात अश्या प्रार्थना आयोजित केल्या जातात,आपण केलेल्या गुन्ह्यांची माफी येशु कडे मागितली जाते ,या दिवशी कोणत्याही प्रकारचा घंटानाद चर्च मध्ये केला जात नाही.तर लाकडी रॅटल वाजवले जातात.

प्रभु येशूने सांगितल्याप्रमाणे लोक प्रेम, सत्य आणि विश्वासाच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात. तसेच लोक चर्चमध्ये क्रॉसचे चुंबन घेऊन प्रभु येशूचे स्मरण करतात. तसेच रोमन समाजातील ख्रिस्ती लोक या दिवशी कडक उपवास करतात आणि उपवासानंतर गोड भाकरी खाल्ली जाते.

या दिवशी कोणताही आनंददायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. ख्रिस्ती भाविक बांधव काळे कपडे घालून चर्च मध्ये येशुने केलेल्या बलिदानाबद्दल प्रार्थना ,कृतज्ञता व्यक्त करतात.जगभरात अश्या प्रार्थना आयोजित केल्या जातात,आपण केलेल्या गुन्ह्यांची माफी येशु कडे मागितली जाते ,या दिवशी कोणत्याही प्रकारचा घंटानाद चर्चमध्ये केला जात नाही.तर लाकडी रॅटल वाजवले जातात.

प्रभु येशूने सांगितल्याप्रमाणे लोक प्रेम, सत्य आणि विश्वासाच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात. तसेच लोक चर्चमध्ये क्रॉसचे चुंबन घेऊन प्रभु येशूचे स्मरण करतात. तसेच रोमन समाजातील ख्रिस्ती लोक या दिवशी कडक उपवास करतात आणि उपवासानंतर गोड भाकरी खाल्ली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com