आज वर्षातली शेवटची अमावस्या; जाणून घ्या महत्व

आज वर्षातली शेवटची अमावस्या; जाणून घ्या महत्व

उदयतिथीनुसार पौष अमावस्या 23 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच आज आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

उदयतिथीनुसार पौष अमावस्या 23 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच आज आहे. पौष अमावस्या तिथीची सुरुवात 22 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच काल संध्याकाळी 07.13 वाजता झाली आहे. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 03.46 वाजता संपेल. पौष अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. २०२२ या वर्षातली ही शेवटची अमावस्या असणार आहे. अमावस्येला चंद्र पाहायला मिळत नाही. त्यामुळेच या दिवसाला नो मून डे असंही म्हटलं जातं.

वर्षभरात ३० अमावस्या पाहायला मिळतात. त्यातली आजची मार्गशीर्ष अमावस्या सर्वात शेवटची अमावस्या म्हणून ओळखली जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. धनुसंक्रांती पौष महिन्यात येते आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होते. धार्मिक आणि आध्यात्मिक चिंतनासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. शास्त्रानुसार या महिन्याला ‘छोटा श्राद्ध पक्ष’ असेही म्हणतात. या महिन्यात तर्पण, पितरांसाठी पिंडदान, भगवान विष्णू आणि सूर्यपूजेलाही विशेष महत्त्व आहे.

या महिन्यात शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य आहेत, त्यामुळे या महिन्यात पितरांची पूजा आणि धार्मिक कार्य करण्याचा नियम आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक चिंतनासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी रात्री एकटे बाहेर पडू नये कारण अमावस्या ही काळी रात्र मानली जाते. पौष अमावस्येच्या दिवशी इतरांच्या घरी अन्न नेऊ नये. त्यापेक्षा या दिवशी आपल्या घरी भोजन करावे. अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य आणि तामसी अन्न खाऊ नये.

मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही अमावस्या म्हणून या अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असं म्हटलं जातं. ज्या महिन्यात जी अमावस्या येते त्या अमावस्येला त्या महिन्याच्या नावाने ओळखलं जातं. अमावस्येला अशुभ मानलं गेलं आहे. नकारात्मक शक्तींचा प्रभाव या रात्री सर्वात जास्त असतो असं मानलं जातं. मात्र दुसरीकडे अमावस्येला देवी लक्ष्मीच्या दोन रुपांची पूजाही केली जाते. धन लक्ष्मी आणि धन्या लक्ष्मी अशा दोन रुपात देवीची पूजा केली जाते आणि देवीचा आशिर्वाद घेतला जातो. सध्या थंडीचे दिवस असल्याने तीळ दानाला विशेष महत्व आहे.

वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com