Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले: सिंहगड किल्ला पुन्हा मावळ्यांनी जिंकला

कल्पना चावला यांचा जन्म, आज डॉक्टर डे, आज कृषी दिन
Published by :
Team Lokshahi

सुविचार

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती लागते ते म्हणजे आत्मविश्वास.

आज कृषी दिन : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

आज डॉक्टर डे : भारताचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिवस देशभरात साजरा होतो. त्यांची जयंती व पुण्यतिथी १ जुलै रोजी आहे.

Dinvishesh
आज काय घडले : ॲपलचा पहिला स्मार्ट फोन बाजारात

आज काय घडले

  • १६९३ मध्ये संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सिंहगड मोगलांकडे गेला होता. नवजी बलकवडे यांनी चारशे मावळ्यांनिशी सिंहगडासारखा अभेद्य किल्ला पुन्हा जिंकून घेतला.

  • १८७९ मध्ये भारतात पोस्टकार्ड बाजारात विक्रीस उपलब्ध झाली. त्यावेळी त्याची किंमत तीन पैसे होती.

  • १९५५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५ नुसार भारयीस स्टेट बँक अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.

  • २०१७ मध्ये देशांतील अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण सुधारणा झाली. वस्तू व सेवाकर म्हणजेच जीएसटी संपूर्ण भारतात लागू करण्यात आला.

Dinvishesh
आज काय घडले: मिझोरामला राज्याचा दर्जा

आज यांचा जन्म

  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा १९१३ मध्ये जन्म झाला. त्यांचा जन्म दिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

  • भारतीय बासरीवादक, संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत.

  • माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते वेंकय्या नायडू यांचा १९४९ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा १९६१ मध्ये जन्म झाला. प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून त्यांनी अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबियावरून अवकाशात उड्डाण केले होते.

  • रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा १९६६ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे १८६० मध्ये निधन झाले.

  • प्रख्यात भारतीय कायदेपंडित, राजकीय कार्यकर्ते व संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांचे १९३८ मध्ये निधन झाले.

  • अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे १९६२ मध्ये निधन झाले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. १९६१ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • मराठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य गणेश हरी पाटील यांचे १९८९ मध्ये निधन झाले. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत आहेत.

  • मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार राजाभाऊ नातू यांचे १९९४ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com