दिनविशेष 1 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 1 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 1 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान - फर्नेस क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे १२७ °F (५३°C) तापमानाची नोंद झाली आहे, सप्टेंबर महिन्यातील ही जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान नोंद आहे.

२०२२: श्रीलंका आर्थिक आणीबाणी - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेसाठी $२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची तात्पुरती मदत करण्यास मान्यता दिली.

१९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

१९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

१९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

१९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.

१९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.

१९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची 'द ओल्ड मॅन अँड द सी' ही कादंबरी प्रकाशित झाली.

१९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.

१९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

१९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

१९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अटॉर्नीची स्थापना झाली.

आज यांचा जन्म

१९७०: पद्मा लक्ष्मी - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक

१९४९: पी. ए. संगमा - लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री

१९४५: भक्ती चारू स्वामी - कृष्णाचेतना आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन)चे आध्यात्मिक नेते (निधन: ४ जुलै २०२०)

१९३१: अब्दुल हक अन्सारी - भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान (निधन: ३ ऑक्टोबर २०१२)

१९३०: चार्ल्स कोरिया - भारतीय आर्किटेक्ट - पद्म विभूषण, पद्मश्री (निधन: १६ जून २०१५)

१९२६: विजयदन देठा - भारतीय लेखक (निधन: १० नोव्हेंबर २०१३)

१९२१: माधव मंत्री - भारतीय क्रिकेटर (निधन: २३ मे २०१४)

१९०८: के. एन. सिंग - हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (निधन: ३१ जानेवारी २०००)

१८९६: स्वामी प्रभूपाद - हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (निधन: १४ नोव्हेंबर १९७७)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: मेरी रॉय - भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या

२०२०: शेखर गवळी - भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (जन्म: ६ ऑगस्ट १९७५)

२००८: थॉमस जे. बाटा - बाटा शू कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

१८९३: काशिनाथ त्र्यंबक तेलंग - न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

१५८१: गुरू राम दास - शीखांचे चौथे गुरू (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com