दिनविशेष 10 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 10 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 10 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
जागतिक विज्ञान दिन
२००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.
२००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.
१९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
१९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
१९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.
१९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.
१९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.
१६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
१६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
आज यांचा जन्म
१९६४: आशुतोष राणा - हिंदी चित्रपट अभिनेते
१९५२: सुनंदा बलरामन् - सुप्रसिद्ध लेखिका
१९२०: दत्तोपंत ठेंगडी - भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक (निधन: १४ ऑक्टोबर २००४)
१९१९: मिखाईल कलाशनिको - एके ४७ बंदुकीचे निर्माते (निधन: २३ डिसेंबर २०१३)
१९०४: कुसुमावती देशपांडे - श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक (निधन: १७ नोव्हेंबर १९६१)
१८४८: सुरेंद्रनाथ बॅनर्जी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू (निधन: ६ ऑगस्ट १९२५)
आज यांची पुण्यतिथी
२०२२: रजनी कुमार - ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक - पद्मश्री (जन्म: ५ मार्च १९२३)
२०१३: विजयदन देठा - भारतीय लेखक (जन्म: १ सप्टेंबर १९२६)
२००९: सिंपल कपाडिया - अभिनेत्री आणि वेशभूषाकार (जन्म: १५ ऑगस्ट १९५८)
१९९६: माणिक वर्मा - गायिका (जन्म: १६ मे १९२६)
१९४१: ल. रा. पांगारकर - संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १८७२)
१९४१: लक्ष्मणरामचंद्र पांगारकर - संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार (जन्म: ३१ जुलै १८७२)
१९२२: गणेश सखाराम खरे - शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ वव ज्योतिर्विद