आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण

आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण

शंकरराव चव्हाण यांचा जन्म, प्रा. राजेंद्रसिंह यांचे निधन
Published by :
Team Lokshahi

सुविचार

ज्ञान उड्या मारत नाही, पायरी पायरीने पुढे जाते

आज काय घडले :

  • १७८९ मध्ये पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. तसेच सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.

  • १८६७ मध्ये आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

  • २००३ मध्ये जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

  • २०१३ मध्ये डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली. १८५४ मध्ये ही सेवा सुरु झाली होती.

आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण
आज काय घडले : मुंबईत एकामागे एक तीन बॉंबस्फोट

आज यांचा जन्म

  • थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा १८५६ मध्ये जन्म झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक होते.

  • महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा १८८४ मध्ये जन्म झाला.

  • उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा १९०२ मध्ये जन्म झाला.

  • केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा १९२० मध्ये जन्म झाला. स्वामी रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.

आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण
आज काय घडले : पानशेत, खडकवासला धरण फुटले

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे १९३६ मध्ये निधन झाले.

  • योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे १९३६ मध्ये निधन झाले. डिव्हाइन लाइफ सोसायटीचे ते संस्थापक होते.

  • सत्तरच्या दशकातील भारतीय चित्रपट सृष्टीतील अतुलनीय भारतीय संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचे १९७५ मध्ये निधन झाले.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री लीला चिटणीस यांचे २००३ मध्ये निधन झाले. त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जू भैय्या यांचे २००३ मध्ये निधन झाले. १९४३ ते १९६७ या काळात ते पदार्थविज्ञानशास्त्राचे प्राध्यापक होते.

  • भारताचे माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे २००८ मध्ये निधन झाले. २२ फेब्रुवारी १९७८ पासून ११ जुलै १९८५ या काळात ते सरन्यायाधीश होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com