दिनविशेष 16 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 16 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 16 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन

युनेस्को (UNESCO)

२०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

१९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

१९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ.

१९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

१९४५: युनेस्को (UNESCO) - स्थापना.

१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

१९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.

१९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.

१९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

१८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

आज यांचा जन्म

१९७३: पुल्लेला गोपीचंद - भारतीय बॅडमिंटनपटू - पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न

१९६८: शोभाजी रेगी - भारतीय राजकारणी (निधन: २४ एप्रिल २०१४)

१९६३: मिनाक्षी शेषाद्री - अभिनेत्री

१९५३: कोडियेरी बालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: १ ऑक्टोबर २०२२)

१९३०: मिहिर सेन - एका वर्षात पाच खंडातील महासागर पोहणारे एकमेव व्यक्ती - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ११ जून १९९७)

१९२७: श्रीराम लागू - भारतीय मराठी अभिनेते - पद्मश्री (निधन: १७ डिसेंबर २०१९)

१८९४: धोंडो वासुदेव गद्रे - केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी (निधन: २२ जानेवारी १९७५)

आज यांची पुण्यतिथी

२००६: मिल्टन फ्रिडमन - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म: ३१ जुलै १९१२)

१९६७: रोशन - संगीतकार (जन्म: १४ जुलै १९१७)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com