दिनविशेष 16 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 16 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 16 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९८७: मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - ओझोनच्या थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.

१९७८: ताबास भूकंप, इराण - या ७.४ मेगावॅटच्या भूकंपामुळे इराण मधील किमान१५ हजार लोकांचे निधन.

१९७५: संयुक्त राष्ट्र - केप वर्दे, मोझांबिक आणि साओ टोमे आणि प्रिन्सिप संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.

१९७५: मिकोयान मिग-31 इंटरसेप्टर - या विमानाच्या पहिल्या प्रोटोटाइपने पहिले उड्डाण केले.

१९७०: ब्लॅक सप्टेंबर - जॉर्डन देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन विरुद्ध युद्धाची घोषणा केली, हे युद्ध ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते.

१९६३: मलाया / मलेशिया - देशाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.

१९६१: टायफून नॅन्सी, जपान - उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मोजले जाणारे सर्वात जोरदार वारे असलेले टायफून नॅन्सी, जपानमधील ओसाका येथे कोसळले, यात किमान १७३ लोकांचे निधन.

१९६१: अंतराळ आणि उच्च वातावरण संशोधन आयोग, पाकिस्तान - स्थापना.

१९५९: पहिले झेरॉक्स मशीन - झेरॉक्स ९१४, या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक, न्यूयॉर्क अमेरिका येथे देण्यात आले.

१९५६: TCN-9, सिडनी - हे नियमित प्रसारण सुरू करणारे पहिले ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन स्टेशन सुरु झाले.

१९५५: बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी - सोव्हिएत युनियनची झुलू-श्रेणीची पाणबुडी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारी पहिली पाणबुडी बनली.

१९३५: बँक ऑफ महाराष्ट्र - इंडियन कंपनीज ऍक्ट अन्वये नोंदणी.

१९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन - कंपनीची स्थापना.

आज यांचा जन्म

१९५४: संजोय बंदोपाध्याय - भारतीय सतारवादक

१९४२: ना. धों महानोर - निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी

१९३०: विजय किचलू - भारतीय शास्त्रीय गायक - पद्मश्री (निधन: १७ फेब्रुवारी २०२३)

१९१६: एम. एस. सुब्बुलक्ष्मी - भारतीय शास्त्रीय गायिका - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: ११ डिसेंबर २००४)

१९१६: रावसाहेब गोगटे - भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक (निधन: २६ फेब्रुवारी २०००)

१९१३: कमलाबाई ओगले - लेखिका (निधन: २० एप्रिल १९९९)

१९०७: वामनराव सडोलीकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (निधन: २५ मार्च १९९१)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: के.डी. शोरे - भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक

२०२०: पी. आर. क्रिष्णा कुमार - भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक (जन्म: २३ सप्टेंबर १९५१)

२०१७: अर्जन सिंग - भारताच्या हवाई दलाचे 3रे प्रमुख (जन्म: १५ एप्रिल १९१९)

१९९४: जयवंत दळवी - साहित्यिक, नाटककार वव पत्रकार (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

१९७७: केसरबाई केरकर - भारतीय शास्त्रीय गायिका - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १३ जुलै १८९२)

१९७३: आबासाहेब मुजुमदार - पर्वती संस्थानचे विश्वस्त आणि संगीतज्ञ

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com