दिनविशेष 20 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 20 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 20 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१७: मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.
२००१: दहशतवादाविरुद्ध युद्ध - अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी लढा देण्याची घोषणा केली.
१९६५: बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.
१९४६: कान्स फिल्म फेस्टिव्हल - पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९४२: युक्रेनमधील होलोकॉस्ट - दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
१९४१: लिथुआनियामधील होलोकॉस्ट - लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.
१८९३: चार्ल्स ड्युरिया - यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली, आणि या उठावाचा अंत झाला.
आज यांचा जन्म
१९४९: प्रयार गोपालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: ४ जून २०२२)
१९४९: महेश भट्ट - चित्रपट दिग्दर्शक
१९४६: मार्कंडेय काटजू - भारतीय वकील आणि न्यायमूर्ती
१९४४: रमेश सक्सेना - क्रिकेटपटू
१९४२: राजिंदर गोयल - भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे (निधन: २१ जून २०२०)
१९३४: राजिंदर पुरी - भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार (निधन: १६ फेब्रुवारी २०१५)
१९२३: अक्किनेनी नागेश्वर राव - भारतीय अभिनेते आणि निर्माते - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २२ जानेवारी २०१४)
१९२२: द. ना. गोखले - चरीत्र वाङ्मयाचे संशोधक (निधन: २७ जून २०००)
१९२१: पनानमल पंजाबी - क्रिकेटपटू
१९११: श्रीराम शर्मा - भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते (निधन: २ जून १९९०)
आज यांची पुण्यतिथी
२०१५: जगमोहन दालमिया - भारतीय उद्योजक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) २६वे अध्यक्ष (जन्म: ३० मे १९४०)
२०१४: अशोक केळकर - भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २२ एप्रिल १९२९)
१९९७: अनुप कुमार - चित्रपट अभिनेते (जन्म: ९ जानेवारी १९२६)
१९९६: दगडू मारुती पवार - कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत
१९२८: नारायण गुरू - केरळमधील समाजसुधारक
१९१५: गुलाबराव महाराज - विदर्भातील सतपुरुष (जन्म: ६ जुलै १८८१)