दिनविशेष 22 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 22 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 22 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

मद्रास दिन

१९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतून हकालपट्टी करण्यात आली.

१९४४: दुसरे महायुद्ध - सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.

१९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.

१८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.

१६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.

आज यांचा जन्म

१९५५: चिरंजीवी - अभिनेते आणि केंद्रीय मंत्री - पद्म भूषण

१९३५: पंडित गोपीकृष्ण - कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. (निधन: १८ फेब्रुवारी १९९४)

१९२०: डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (निधन: १८ नोव्हेंबर २०१६)

१९१९: गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (निधन: १० जानेवारी १९९४)

१९१८: बानू कोयाजी - कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या - पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १५ जुलै २००४)

१९१५: शंभू मित्रा - बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (निधन: १९ मे १९९७)

१६४७: डेनिस पेपिन - प्रेशर कुकरचे निर्माते (निधन: २६ ऑगस्ट १७१३)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: ए. जी. नाडियादवाला - भारतीय चित्रपट निर्माते

२०२२: आर. सोमशेखरन - भारतीय गायक, संगीतकार

२०१४: यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

१९९९: सूर्यकांत मांढरे - मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते

१९९५: पं. रामप्रसाद शर्मा - संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक

१९८९: पं. कृष्णराव शंकर पंडित - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: २६ जुलै १८९३)

१९८२: एकनाथ रानडे - क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

१९८०: किशोर साहू - चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com