आज काय घडले : जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासीत प्रदेश

आज काय घडले : जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासीत प्रदेश

काजोल देवगणचा जन्म, लाला अमरनाथ यांचे निधन

सुविचार

कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्ट लपून राहत नाही. सूर्य, चंद्र व सत्य.

आज काय घडले

 • १९६२ मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार मिळवणारे भारतरत्न नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. मजुरांना संपासाठी प्रोत्साहीत करणे आणि विना परवानगी देश सोडणे हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. १२ जुलै १९६४ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तब्बल २७ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची ११ फेब्रवारी १९९० रोजी सुटका झाली. त्यानंतर ते आफ्रिकेचे राष्ट्रपती झाले.

 • १९६५ मध्ये पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये मुजाहीद्दीन म्हणून सुमारे ३० हजार सैनिकांना घुसवले. परंतु भारतीय सैन्याने पाकिस्तानचा डाव उधळून लावला. भारतीय सैन्याने १५ ऑगस्ट १९६५ रोजी आंतरराष्ट्रीय सीमा ओलंडत पाकिस्तानवर जोरदार चढाई करत लाहोर ताब्यात घेतले.

 • १९९१ मध्ये दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या न्यायमूर्ती लीला सेठ या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

 • २०१९ मध्ये जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत संमत झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासीत प्रदेश झाले. तसेच काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

आज यांचा जन्म

 • इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा १८५८ मध्ये जन्म झाला.

 • पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध इतिहासकार, लेखक आणि वक्ते तसचं, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तात्रय वामन पोतदार उर्फ दत्तो वामन पोतदार यांचा १८९० मध्ये जन्म झाला.

 • चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा १९३० मध्ये जन्म झाला.

 • मराठी लेखिका व समिक्षक विजया राजाध्यक्ष यांचा १९३३ मध्ये जन्म झाला. त्या ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

 • भारतीय क्रिकेटपटू बापू कृष्णराव व्यंकटेश प्रसाद यांचा १९६९ मध्ये जन्म झाला.

 • बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी काजोल देवगणचा १९७४ मध्ये जन्म झाला. अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com