Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : टायगर हिल्स घुसखोऱ्यांच्या ताब्यातून मुक्त

विनायक बुवा यांचा जन्म, स्वामी विवेकानंद यांचे निधन
Published by :
Team Lokshahi

सुविचार

प्रश्न निर्माण करणारी माणसे हुषार असतात. प्रश्नच निर्माण होऊ नयेत; म्हणून जे काम करतात, ती बुद्धिमान असतात.

आज काय घडले

  • १७७६ मध्ये अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले. १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस या युरोपियन दर्यावर्दीला अमेरिकेचा शोध लावला होता.

  • १९९७ साली अमेरिकेचे पाथ फाईफाइंडर हे मानवरहित यान मंगळ ग्रहावर उतरले.

  • १९९९ साली भारतीय लष्कर दलाच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील टायगर हिल्स हा महत्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

Dinvishesh
आज काय घडले : कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीकडे

आज यांचा जन्म

  • हिमालयातील पर्वतरांगाच्या सर्वेक्षणामध्ये महत्त्वाचा असलेल्या एव्हरेस्टची उंची मोजण्यात महत्वाची कामगिरी बजावणारे जॉर्ज एव्हरेस्ट यांचा १७९० मध्ये जन्म झाला. त्यांच्या नावावरुन हिमालयातील सर्वोच्च शिखराला एव्हरेस्ट हे नाव देण्यात आले.

  • भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा १८९८ मध्ये जन्म झाला. १९९७ मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

  • हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा १९१२ मध्ये जन्म झाला.

  • विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा यांचा १९२६ मध्ये जन्म झाला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५०हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

Dinvishesh
आज काय घडले: सिमला करारावर झाल्या स्वाक्षऱ्या

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांचे १९०२ मध्ये निधन झाले. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्ण यांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले.

  • नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे १९३४ मध्ये निधन झाले.

  • विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे १९९९ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com