Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

सुनील दत्त यांचा जन्म, शांता शेळके यांचे निधन
Published by :
Team Lokshahi

महाराजांच्या राज्याभिषेकासाठी जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

सुविचार

शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहावे लागते.

Dinvishesh
आज काय घडले : शिवाजी महाराजांची झाली सुवर्णतुला

आज काय घडले

  • १६७४ मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांच्या राज्यभिषेकासाठी जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

  • १९३० मध्ये देशातील अर्थशास्त्रातील सर्वात जुनी संशोधन व प्रशिक्षण संस्था गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना पुण्यात झाली. १९९३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला.

  • १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना काढण्यासाठी भारतीय लष्कराने सुरु केलेले ऑपरेशन ब्ल्यु स्टार पुर्ण झाले. त्यात ५७६ जण ठार झाले.

आज यांचा जन्म

  • कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा १८९१ मध्ये जन्म झाला.

  • मराठी लेखक, ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे यांचा १९०९ मध्ये जन्म झाला. त्यांनी 'अभिनव मराठी ज्ञानकोश' नावाचा ज्ञानकोश रचला.

  • भारतीय अभिनेता सुनीलदत्त यांचा १९२९ मध्ये जन्म झाला. मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते.

  • भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा १९७० मध्ये जन्म झाला. भारतीय क्रिकेट संघ निवडीच्या समितीमध्ये ते होते.

आज यांची पुण्यतिथी

  • शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे १९४१ मध्ये निधन झाले.

  • आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संत रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे १९५७ मध्ये निधन झाले. ते अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.

  • मराठी कवयित्री शांता शेळके यांचे २००२ मध्ये निधन झाले. त्या प्राध्यापिका, संगीतकार, बाल साहित्य लेखिका होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com