आज काय घडले : महात्मा गांधींचा मुंबईत भारत छोडोचा नारा

आज काय घडले : महात्मा गांधींचा मुंबईत भारत छोडोचा नारा

दादा कोंडके यांचा जन्म, दिलीप सरदेसाई यांचा जन्म
Published by :
Team Lokshahi

सुविचार

पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.

आज काय घडले

  • १५०९ मध्ये राजा कृष्णदेव राय यांच्या साम्राजाची स्थापना झाली. तेनाली रामाच्या गोष्टीत वाचलेले विजयनगरचे राजा कृष्णदेव राय आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते सिंहासनावर बसले. रायचूरच्या लढाईत त्यांना मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मोगल राजांवर त्याचा चांगलाच वचक बसला. त्यांनी जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होती.

  • १९४२ मध्ये महात्मा गांधींनी मुंबईत भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले. ९ ऑगस्ट पूर्वीच काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांना अटक झाली होती. या आंदोलना दरम्यान ९४० जण शहीद झाले. १६३० जण जखमी झाले. ६० हजार २२९ जणांना अटक झाली होती.

  • १९४९ मध्ये भूतान स्वतंत्र राष्ट्र झाले. भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • १९९८ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

आज यांचा जन्म

  • जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा १९१२ मध्ये जन्म झाला.

  • पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचा १९१५ मध्ये जन्म झाला.

  • मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा १९३२ मध्ये जन्म झाला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या.

  • भारतीय क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा १९४० मध्ये जन्म झाला.

  • भारतीय राजकारणी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य कपिल सिब्बल यांचा १९४८ मध्ये जन्म झाला.

  • स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा १९८१ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • वैद्यकीय व्यवसाय सांभाळून साहित्यिक अभिरुची जोपासणाऱ्या लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे १९९८ मध्ये निधन झाले.

  • मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे १९९९ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com