Eknath shinde
Eknath shindeTeam Lokshahi

ग्लोबलपासून लोकलपर्यंत सर्वच बातम्या 'लोकशाही' भक्कमपणे मांडतोय : एकनाथ शिंदे

लोकशाहीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या स्पेशल शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य लोकशाही मराठी न्यूजने साधून एका मोठ्या प्रवासाला सुरुवात केली. जनतेचा आवाज बनण्यासाठी लोकशाही न्यूज मैदानात उतरलं आणि प्रेक्षकांनी, हितचिंतकांनीदेखील लोकशाही न्यूजला भरपूर प्रेम दिले. याच आधारावर लोकशाहीने आज 3 वर्षांची गौरवपूर्ण वाटचाल पूर्ण केली असून चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित लावत शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नव्हेतर लोकशाहीच्या स्टुडीओमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः बातम्या सादर केल्या.

Eknath shinde
खरी 'लोकशाही' लोकांना जाणवू देतील; राज ठाकरेंच्या वर्धापन दिनानिमित्त खास शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकशाही चॅनेल नव्याने रिलॉन्चिंग झाले आहे. चॅनेलचे मालक गणेश नायडू व संपादक कमलेश सुतार तसेच, सर्व लोकशाहीच्या टीमला तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. लोकशाही न्यूज चॅनेल सर्वात तरुण असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरपासून ते स्थानिक गल्लीबोळातील देखील बातम्या अत्यंत यशस्वीपणे व भक्कमपणे मांडत आहेत. राजकीय आणि विकासात्मक बातम्या लोकशाहीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवत आहेत.

बातम्या तर सर्वच जण देत असतात. परंतु, राज्यासाठी, लोकांसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे राज्यकर्ते असतील त्यांचे देखील काम व लोकांसाठी विकासात्मक आणि हिताचे लोकशाहीच्या माध्यमातून आपण मांडताना मी पाहिलेले आहे. ज्या-ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्याला वाचा फोडण्याचे काम आपण करत आहेत. तसे याही पुढे महाराष्ट्रच्या तमाम तळा-गाळातील दुर्गम भागातील बातम्या लोकांसमोर राज्यासमोर आणाल, अशी आशा व्यक्त करतो, अशा सदिच्छा एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

लोकशाहीच्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांना शाल देण्यात आली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बोर्डवर स्वाक्षरी करत लोकशाहीला शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com