आज माघी गणेश जयंती; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेचे महत्व

आज माघी गणेश जयंती; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेचे महत्व

यंदा २५ जानेवारी बुधवार रोजी, माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज २५ जानेवारी बुधवार रोजी, माघी गणेश जयंती साजरी केली जाईल. गणपतीचे एकूण तीन अवतार समजले जातात. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस साजरे केले जातात. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा करतात. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा करतात.

दक्षिण भारतीय मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा पुत्र गणेशाची पूजा केली जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारीला दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 25 जानेवारीला रात्री 12.34 मिनिटांपर्यंत संपेल. मात्र, उदय तिथीनुसार गणेश जयंती 25 जानेवारी बुधवारी आहे. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते 12.34 आणि रवियोग बुधवारीच सकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत असेल. परीघ योग 24 जानेवारी रोजी रात्री 9.36 ते 25 जानेवारी सायंकाळी 6.15 पर्यंत असेल. शिवयोग 25 जानेवारीच्या संध्याकाळी 6.15 ते 26 जानेवारीला सकाळी 10.28 पर्यंत असेल.

गणेश ही बुद्धीची आणि शुभाची देवता आहे. त्याच्या कृपेने जीवनात शुभता येते, माणसाला अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना शुभ आशीर्वाद देतो.

श्री गणेश जयंतीची शुभ वेळ

२५ जानेवारी रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.२९ ते दुपारी १२.३४ पर्यंत शुभ मुहूर्त असेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com