श्री पंचकेदार मंदिर
श्री पंचकेदार मंदिरTeam Lokshahi

'श्री पंचकेदार मंदिरात' यंदाच्या गणेशोत्सवात विराजमान होणार 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे १३० व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi

अमोल धर्माधिकारी, पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Halwai) सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे १३० व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात येणार आहे. कोविड महामारीमुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना पुन्हा एकदा याजागी श्रीं चे दर्शन घेता येणार आहे. यंदाची सजावट असलेले श्री पंचकेदार मंदिर उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित असलेल्या आणि अत्यंत पवित्र असलेल्या भगवान शिवाच्या पंचकेदार मंदिराची तेजस्वी प्रतिकृती आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे.

प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह पंचकेदार मंदिर या नावाने प्रसिध्द आहे. ही पाच शिव मंदिरे उत्तराखंड मधील गढ़वाल येथे स्थितअसून शिवशंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या नावांनी प्रसिद्ध आहेत. पंचकेदार मंदिर म्हणजे पाच सुवर्णी शिखरांचे असून हिमालयातील मंदिर स्थापत्याची प्रतिकृती असेल.

भगवान शिवाच्या पंचमुखी रुपाची प्रतिष्ठापना या मंदिराच्या ललाट बिम्बावर असून, हिमालयातील मंदिरशिल्प समूहाची ही कलात्मक पुर्नरचना असणार आहे. गंगा, यमुनोत्री, भागीरथी किंवा गंगा तसेच शिवाच्या अष्टमूर्तींचे प्रतिक असलेले गर्भगृह आणि प्रत्यक्ष शिवाचे वाहन नंदीच्या शिल्पाने आणि अनेक देवता, शिवगणांच्या, सुरसुन्दरींच्या तसेच पशु-पक्ष्यांच्या, लता-वेलींच्या मूर्तीरुप उपस्थितीने श्रीगणरायाचे यंदाचे श्रीपंचकेदार मंदिर, म्हणजे प्रत्यक्ष शिवलोक असेल. श्रीपंचकेदारमंदिर म्हणजे तीर्थ स्थळातील प्रमुख असलेल्या चारधाम यात्रेचे एक प्रमुख मंदिर असून त्या मंदिरसमूहाचे दुर्लभ दर्शन गणेशोत्सवात घडेल.

श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १०० फूट लांब, ५० फूट रंद आणि ८१ फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. सजावट विभागात ४० कारागिर दिवस-रात्र कार्यरत राहणार असून त्यानंतर राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येणार असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने दर्शन घेणे शक्य होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

श्री पंचकेदार मंदिर
आज काय घडले: अर्जुन रणगाड्यांची भारतीय लष्कराकडे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com