gold price
gold priceTeam Lokshahi

गुढीपाडव्याला सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव...

तुम्हाला सोने खरेदी करायच आहे तर ह्या पेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणताच
Published by :
Team Lokshahi

सण म्हटला की खरेदी आणि खरेदी म्हटले की दागिन्याचा समावेश होतो. चैत्र महिन्यापासून (month of Chaitra) हिंदू व मराठी नववर्षाचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा (Gudhipadva) होय. गुढीपाडव्याला अनेक लोक आवर्जून सोने चांदी (gold silver) खरेदी करतात. जर तुम्हाला सोने खरेदी करायच आहे तर ह्या पेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कोणताच नाही कारण सोने चांदीच्या भावात (Gold silver price) घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. सोनं कधी महाग तर कधी स्वस्त होतं पण आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे या सणाच्या मुहूर्तावर काही ना काही खरेदी करायची असेल तर कमी झालेल्या भावामध्ये सोनं खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे.

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात 300 रूपयांची घसरण झाली आहे व चांदीच्या भावात 700 रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 51 हजार 500 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर चांदीचा भाव 68 हजार 800 रुपय प्रति किलोपर्यंत खाली आला आहे.

देशात सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉल मार्क (Hall Mark) दिले जातात. 24 कॅरेटवर (carat) 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने खरेदी करताना लोकांनी सोन्याची गुणवत्ता तपासून पाहावी. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच ग्राहकांनी ती खरेदी करावी.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com