धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' खास मेसेज पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' खास मेसेज पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या शुभेच्छा

आम्ही तुमच्यासाठी धनत्रयोदशीच्या अशाच काही निवडक शुभेच्छा घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना देण्यासाठी पाठवू शकता.

Dhantrayodashi 2023 : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने तुमची संपत्ती 13 पट वाढते. या दिवशी त्यांच्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना विशेष शुभेच्छा देखील पाठवतात. आम्ही तुमच्यासाठी धनत्रयोदशीच्या अशाच काही निवडक शुभेच्छा घेऊन आलो आहोत ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना देण्यासाठी पाठवू शकता.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवाळी आली सोनपावली,

उधळण झाली सौख्याची,

धनधान्यांच्या भरल्या राशी

घरी नांदू दे सुख समृद्धी…

धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

धन धान्याची व्हावी घरीदारी रास,

राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो

तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो

आप्तेष्ठांची सदैव साथ असो

यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,

कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,

फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,

मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली…

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com