Independence Day 2023 Speech: 15 ऑगस्टला करा हे सोपं भाषण; जाणून घ्या मुद्दे
येत्या 15 ऑगस्ट रोजी भारत आपल्या 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. या निमित्ताने देशभरातील शाळा, सरकारी आणि खाजगी कार्यालयात भाषणं केली जातात. 15 ऑगस्ट हा तो दिवस आहे ज्या दिवशी इंग्रजांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून भारताची सुटका झाली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय इत्यादींमध्ये भाषण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे मुद्दे सांगत आहोत.
छोटेखानी मराठी भाषण निबंध
म्हा सर्वांना ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक यांसारख्या अनेक क्रांतिकारकांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे देश स्वतंत्र करण्यात महत्त्वाचे योगदान आहे.
स्वातंत्र्यदिनी, देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या राष्ट्रध्वज तिरंगा फडकवतात आणि 31 तोफांची सलामी दिली जाते. यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात. याशिवाय शाळा, सरकारी कार्यालय आदी ठिकाणीही तिरंगा फडकवला जातो. यासह सांस्कृतिक कार्यक्रम होतात. राष्ट्रगीत गायले जाते. देशभक्तीपर गीते आणि घोषणा सर्वत्र ऐकू येतात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती ‘राष्ट्राला अभिभाषण’ करतात.
भारत माता की जय.
छोटे भाषण
आज आपण देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आलो आहोत. तुम्हा सर्वांना ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ हा तो दिवस आहे. जेव्हा आपल्या देशाला 200 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या त्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक यांसारख्या अनेक क्रांतिकारकांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचे देश स्वतंत्र करण्यात महत्त्वाचे योगदान आहे.
स्वातंत्र्यसैनिकांसमोर नतमस्तक होण्याचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. याचा राष्ट्रीय स्तरावरील मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रध्वज तिरंगा फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. भारत माता की जय.