Kabir Das Jayanti 2023 : कबीरदासांच्या 'या' दोह्यांमध्ये दडलायं यशाचा मार्ग

Kabir Das Jayanti 2023 : कबीरदासांच्या 'या' दोह्यांमध्ये दडलायं यशाचा मार्ग

संत कबीरदासांची जयंती दरवर्षी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी संत कबीरदासांची 646 वी जयंती साजरी होणार आहे.

ज्येष्ठ पौर्णिमेला संत कबीर यांची जयंती साजरी केली जाते. कबीरांनी तत्कालीन अनिष्ट रूढींवर जोरदार प्रहार केले. निर्भिडता हे त्यांच्या ओव्यांचे मुख्य वैशिष्ट्य असून, तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवून दिले. संत कबीर हे काळाच्या पुढे असलेले संत होते. धार्मिक थोतांडावर कडक शब्दांत आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणारा पुरोगामी संत म्हणजे कबीर.

संत कबीरदासांची जयंती दरवर्षी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार, ते वर्ष 04 जून 2023 रोजी रविवारी येते. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये संत कबीरदासांची 646 वी जयंती साजरी होणार आहे.

आज कबीर जयंती निमित्त काही प्रसिद्ध 'कबीर दोहे'

रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय ।

हीरा जन्म अमोल सा, कोड़ी बदले जाय ।

अर्थ - रात्र झोपण्यात घालवली आणि दिवस खाण्यात, मनुष्य जन्म इतका अनमोल होता जो तू असा वाया घालवलास. आयुष्य सार्थकी न लावणाऱ्या जन्माची किंमत शेवटी फक्त एका कवडी इतकी राहिली.

दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,

तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार ।

अर्थ : कबीर यांनी सांगितले की, मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. कबीर या दोह्यात म्हणतात की, जसं झाडावरून गळलेलं पान पुन्हा झाडाला जोडता येत नाही अगदी तसे मानव शरीर वारंवार मिळत नाही.

जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही |

सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही |

अर्थ : जेव्हा मला अहंकाराने घेरलं होतं तेव्हा देव दिसला नाही पण गुरूंच्या उपदेशाने, मार्गदर्शनातून मला ज्ञानाचा प्रकाश दिसला आणि माझ्या अज्ञान रुपी अंधकार दूर झाला.

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,

मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।

अर्थ : ज्ञानी माणसाच्या जाती पेक्षा त्याचं ज्ञान महत्वाच आहे. यावेळी कबीर म्हणतात की तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,

ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।

अर्थ : पोथी पुरण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी झाले नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच शब्द जरी समजून घेतले तरी खरा प्रेमाचा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय,

जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ।

अर्थ : जेव्हा मी जगात वाईट शोधायला निघालो तेव्हा मला तिळमात्र वाईट दिसलं नाही पण जेव्हा मी माझ्या अंतकरणात डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगात माझ्या पेक्षा कोणीच वाईट नाही.

धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय,

माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ।

अर्थ : माळीने झाडाला कितीही घडाभर पाणी टाकलं तरी ऋतू आल्यावरच त्याला फळे लागतात तसेच कबीर म्हणतात की, धैर्य ठेवून काम केल्यानेच सर्व काही सिद्धीस जाते.

दोस पराए देखि करि, चला हसन्त हसन्त,

अपने याद न आवई, जिनका आदि न अंत।

अर्थ : कबीर म्हणतात की माणूस दुसऱ्यांचे दोष बघता बघता स्वतःचे दोष विसरतो ज्याचा कुठे अंतच नाही.

अति का भला न बोलना, अति की भली न चूप,

अति का भला न बरसना, अति की भली न धूप।

अर्थ : जास्त बोलणंही बरोबर नाही आणि जास्त गप्प बसणंही चांगलं नाही जसं खूप पाऊस आणि खूप उन दोन्हीही प्रकृतीसाठी हानिकारक असतात. कबीर सांगतात सर्व काही प्रमाणात असायला हवं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com