Mahatma Gandhi Jayanti: राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ भन्नाट गोष्टी, जाणून घ्या...

Mahatma Gandhi Jayanti: राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ भन्नाट गोष्टी, जाणून घ्या...

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे.
Published by :
Team Lokshahi

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना गांधीजींच्या समोर अनेक आव्हाने सुद्धा उभी होती. तरीही गांधीजी यांनी कधीच हार न मानत त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि एकनिष्ठा दाखवत अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपले काम सुरुच ठेवले होते. याच पार्श्वभुमीवर येत्या २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती साजरी केली जाणार आहे.

महात्मा गांधी यांचे जन्म २ ऑक्टोंबर १८६९ मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला होता. गांधीजी यांना राजकीय नव्हे तर आयुष्यातील विविध पैलूवर त्यांचा उत्तम प्रभाव होता. समाज सुधारक, कुशल अर्थतज्ञ यांच्यासह उत्कृष्ट जनसंपर्क गांधीजी यांच्याकडे होते. महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यात तीन महत्वपूर्ण सुत्रांच्या आधारावर आयुष्य जगण्याचे ठरविले होते. तसेच या सुत्रांमुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणून ही संबोधले गेले. पहिले सुत्र म्हणजे सामाजातील घाण साफ करणे. यासाठी गांधीजी यांनी झाडूचा आधार घेतला होता. त्यानंतर दुसरे सुत्र म्हणजे सामूहिक प्रार्थनेला बळ देणे. त्यामुळे एकजुटीने लोक जात-पात आणि धर्म न पाहता देवाची प्रार्थना करतील. तिसरे आणि महत्वपूर्ण सुत्र असे होती की, चरखा. तो गांधीजींचा आत्मनिर्भर आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. गांधीजींच्या याच तीन महत्वपूर्ण सुत्रांमुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून सर्वजण ओळखू लागले होते.

महात्मा गांधी जयंती कशी साजरी केली जाते?

गांधी जयंतीला राजघाट नवी दिल्ली येथील गांधी पुतळ्यासमोर लोक श्रद्धांजली अर्पण करतात. हा दिवस राष्ट्रीय सुट्टी असते. गांधी जयंतीचा उत्सव सर्व शाळा आणि कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावेळी कोरोनामुळे लोक घरातच असल्याने प्रत्येकाने घरातच राहून महात्मा गांधी यांना उत्साहपणे श्रद्धांजली अर्पण करून ही जयंती साजरी करुयात.

महात्मा गांधींबद्दलच्या भन्नाट गोष्टी

महात्मा गांधींपासूनच प्रेरणा घेऊन जगाच्या 4 खंडातील 12 देशात नागरी हक्क चळवळ उभी राहिली.

महात्मा गांधींना सन्मान देण्यासाठीच अॅपलचे सह-संस्थापक स्टिव्ह जॉब्ज हे महात्मा गांधींसारखा चष्मा घालायचे.

महात्मा गांधींचा सन्मान करण्यासाठी, गांधींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनंतर ग्रेट ब्रिटनने एक तिकीट जारी केलं.

1930 मध्ये जेव्हा गांधींजीना यूएस रेडीओवर मुलाखतीसाठी बोलावलं, तेव्हा त्यांनी माईककडे पाहून म्हटलं,’ मला गोष्टीमध्ये बोलायचे आहे का?’

फोर्ड कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हे गांधींचे समर्थक होते, तेव्हा ते भारतातील एका पत्रकाराने त्यांना भेट दिलेला चरखा रोज फिरवत.

गांधींनी महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती.

आतापर्यंतचे महात्मा गांधी असे पहिले भारतीय आहे, ज्यांना ”टाईम पर्सन ऑफ द इयर” ही पदवी देण्यात आली आहे. 1930 ला त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.

महात्मा गांधी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा नामांकीत झाले, पण त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही.

महात्मा गांधींच्या निधनानंतर जेव्हा अंतयात्रा काढण्यात आली, ती अंतयात्रा तब्बल 8 किलोमीटर लांब होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com