Kalki Jayanti: कल्की जयंती जाणून घ्या भगवान विष्णूच्या दहाव्या अवताराबाबत

Kalki Jayanti: कल्की जयंती जाणून घ्या भगवान विष्णूच्या दहाव्या अवताराबाबत

कल्कि अवतार हा भगवान विष्णुचा शेवटचा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या षष्ठीला कल्की जयंती साजरी केली जाते.
Published by  :
Team Lokshahi

Kalki Jayanti 2023: हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यापासून सण-उत्सवांना प्रारंभ होत असतो. कल्की अवतार हा भगवान विष्णुचा शेवटचा अवतार मानला जातो. भगवान विष्णु हा 10 वा अवतार आहे. श्रावण महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या षष्ठीला कल्की जयंती साजरी केली जाते.

पौराणिक ग्रंथानुसार, भगवान विष्णुने आतापर्यंत 9 अवतार घेतले आहेत. त्यात मत्स्य, कूर्मा, वराह, नरसिम्हा, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध. तर कल्की अवतार हा 10 वा असणार आहे. त्यामुळे ही कल्की जयंती साजरी केली जाते. भगवान विष्णुच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णु मंत्र, विष्णु चालिसाचे पारायण केले जाते. भगवान विष्णु आपल्या भक्तांला कधीच रिकाम्या हातांनी परत पाठवत नाही. आयुष्यातील सर्व विघ्णे दूर होऊन जातात. सर्व पापातून मुक्ती होते.

कल्की जयंतीचे महत्त्व

भगवान विष्णुने उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्ल षष्ठीला कल्की अवतार घेणार आहे. विष्णुचा कल्की अवतार हा क्रोधीत मानला जातो. कल्की जयंतीला मोक्ष प्राप्तीसाठी भगवान विष्णूची पूजा केला जाते. व्रत केलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, कल्की अवताराला देवाचं सर्वोत्तम आठ गुणांचे प्रतिक मानले जाते.

कल्की अवताराचा मुख्य उद्देश अविश्वासू जगाची मुक्ती आहे. कलियुगात लोकांचा धर्म आणि कर्मावरचा विश्वास उडाला आहे. भौतिक लोभात ते धर्म आणि कर्म विसरत चालले आहेत. भ्रष्ट राजांचा वध केल्यावर, कल्की मानवी जगात भक्ती जागृत करेल. पुन्हा एकदा लोकांची धर्मावरील श्रद्धा जागृत होईल. यानंतर एक नवीन निर्मिती तयार केली जाईल, अशी मान्यता आहे.

असे सांगितलं जातं, की कल्की जयंतीची सुरूवात सुमारे 300 वर्षांपूर्वी राजस्थानात झाली होती. मावजी महाराज यांनी कल्की जयंती प्रथम साजरी केली होती. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला म्हणजेच सहाव्या दिवशी मावजी महाराजारांनी कल्की जयंती साजरी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com