महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा त्यांचे 'हे' प्रेरणादायी विचार

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा त्यांचे 'हे' प्रेरणादायी विचार

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीशिवाय 30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरित करतात.

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीशिवाय 30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार सोशल मीडियावर शेअर करुन विनम्र अभिवादन करा.

आधी ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण त्यानंतर तुम्ही जिंकणार

- महात्मा गांधी

प्रार्थना करतांना मागणी करू नका. मागणे ही आत्म्याची लालसा आहे. मागण्यांशिवाय मन लावून प्रार्थना करणे कधीही श्रेयस्कर.

- महात्मा गांधी

ज्या स्वातंत्र्यात चूक करण्याचे स्वातंत्र नाही त्या स्वातंत्र्याचा काहीच उपयोग नाही.

- महात्मा गांधी

मूल्यांमधून विचार जन्माला येतात. विचारांमधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतींमधून माणसांची व्यक्तिमत्वे घडतात.

- महात्मा गांधी

एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाश्यांच्या हृदयात आणि आत्म्यात वसलेली असते.

- महात्मा गांधी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com