Milk ATM ; भारीच! आता पुण्यात एटीएममधून मिळणार दूध

Milk ATM ; भारीच! आता पुण्यात एटीएममधून मिळणार दूध

Published by :

पुणे तिथे काय उणे असे आपण अनेकदा बोलतो. याची अनेकदा प्रचिती देखील आली आहे. त्याचाच विचार करता आता पुण्यात चक्क एटीएममधून दूध मिळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कस शक्य आहे? तर ही भन्नाट संकल्पना पुण्यातील आनंद कुलकर्णी यांनी अमलात आणली आहे. नेमकं काय आहे ही संकल्पना पाहूयात…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शहरातील दुकाने लवकर बंद होतात. त्यामुळे नागरिकांना दूध मिळण्यास अडचणी निर्माण होतात.या पार्श्वभूमीवर आनंद कुलकर्णी यांनी गोपी डेअरीच्या माध्यमातून एक भन्नाट संकल्पना अमलात आणत पुण्यातील दीप बंगला चौकात म्हशीच्या ताज्या दुधाचे एटीएम सुरू केले आहे.

त्या माध्यमातून ग्राहकाला हवे तितक्याच पैशांचे दूध तूम्हाला मिळणार आहे. हे दूध शुद्ध ताजे असणार आहे. एटीएममध्ये दुधाचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कायम ठेवण्यात येते. ज्यामुळे त्याची गुणवत्ता टिकते.दरम्यान, ग्राहकांना या एटीएममधून गरजेनुसार दहा रुपयांपासून ते पुढे कितीही दूध घेता येईल. ज्या ग्राहकांनी स्वतःची किटली आणली तर प्लास्टिकचा वापर देखील या माध्यमातून टाळता येणार आहे. त्यामुळे ही संकल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगी ठरणार आहे.आनंद कुलकर्णी हे इंजिनिअर असून ते 91 सालापासून दुधाचा व्यवसाय करतात. त्यांच्या गोपी डेअरीच्यावतीने सुरू करण्यात आलेली ही भन्नाट संकल्पना पुणेकरांच्या पसंतीस नक्की उतरणार यात काही शंका नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com