Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज ठाकरेंचा हा 55 वा वाढदिवस असणार आहे.
Published by :
Sagar Pradhan

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बुधवारी म्हणजेच 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा हा 55 वा वाढदिवस असणार आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली. संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी होर्डिंग लावण्यात येत आहेत. तर काही होर्डिंगसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मागच्या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव असल्यामुळे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदाचा राज ठाकरेंचा वाढदिवस महत्वाचा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com