Navratri 2022
Navratri 2022Team Lokshahi

नवरात्रीतील नऊ रंग; जाणून घ्या नवरात्रीतील नऊ रंगांचे महत्त्व

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरु झाली आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते.
Published by :
shamal ghanekar

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरु झाली आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. तसेच नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास आणि देवीची पूजा मनभावे करण्यात येते. तसेच नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंगांचे (Nine Colours) विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये रंगांचा उत्सवही आपल्याकडे साजरा केला जातो. तर चला जाणून घेऊया या नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व.

नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व

शैलपुत्री देवीचा आवडता रंग पांढरा आहे. पांढरा रंग हा निखळपणा, निस्वार्थ प्रेमाचं आणि शांततेचे प्रतीक आहे.

लाल रंग हा ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग लाल आहे आणि हा रंग शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.

निळा हा ‘चंद्रघंटा’ देवीचा आवडता रंग आहे. हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

‘अष्टभुजा’ देवीचा आवडता रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा संपत्तीचा, स्नेहाचे प्रतीक आहे.

स्कंदमाता देवीचा आवडता रंग हिरवा आहे. हा रंग, सौभाग्य, समृद्धीचे प्रतीक आहे.

करडा रंग हा राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी देवीचा आवडता रंग आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.

देवी पार्वतीचे सातवे रुप म्हणजे काली माता देवीचा आवडता रंग नारंगी आहे. नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.

मोरपंखी हा रंग महागौरी देवीचा आवडीचा रंग आहे. हा रंग मयूरता, सुंदरता, दृढ विश्वास आणि समृध्दीचे प्रतीक आहे.

गुलाबी रंग हा सिध्दीदात्री देवीचा आवडता रंग गुलाबी आहे. महत्वाकांक्षा, आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे सद्भावाचे प्रतिक आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com