माऊलींच्या गाभाऱ्यात मोसंबींची आरास

माऊलींच्या गाभाऱ्यात मोसंबींची आरास

विठ्ठल मंदिरात फुलं आणि फळांचा वापर होऊन कलात्मक पद्धतीनं विविध प्रकारची सजावट नेहमी केली जाते.
Published by  :
shweta walge

विठ्ठल मंदिरात फुलं आणि फळांचा वापर होऊन कलात्मक पद्धतीनं विविध प्रकारची सजावट नेहमी केली जाते.

आज दिवाळी पाडवा यानिमित्तानं पंढरीत माऊलींच्या राऊळीला आकर्षक सजावट केली आहे.

यावेळी दिवाळी पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या विठ्ठल भक्तानं सात हजार मोसंबी वापरून मंदिरात आकर्षक सजावट केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या वाघाली येथील आप्पासाहेब रामकृष्ण पाटील या विठ्ठल भक्तानं सजावट केली आहे.

सात हजार मोसंबी वापरून विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट केली आहे.

यंदा आज पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात मोसंबीचा वापर करण्यात आला आहे. या सजावटीमुळे विठ्ठल मंदिराला मोसंबी बागेचं रुप आलं आहे.

दिवाळीनिमित्त विठ्ठलाची भेट घेण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com