Police Commemoration Day 2021;…म्हणून आजच्याच दिवशी भारतीय पोलीस स्मृतिदिन साजरा करतात

Police Commemoration Day 2021;…म्हणून आजच्याच दिवशी भारतीय पोलीस स्मृतिदिन साजरा करतात

Published by :

आज भारतीय पोलीस स्मृतिदिन. भारतीय पोलीस दलात कर्तव्य बजावताना शहिद झालेल्या शूर पोलिसांच्या स्मरणार्थ आजच्याच दिवशी त्यांचा सन्मान केला जातो. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.

का साजरा करतात हा दिवस? :

▪️ 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख भागातील सरहद्दीवर 18 हजार फुट उंचीवर 'हॉट स्प्रिंग्ज' या ठिकाणी भारतीय जवान गस्त घालत होते. तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालत हॉट स्प्रिंग्जच्या पूर्वेला 4 मैल दूर आली असताना पर्वताच्या डावे बाजूला तुकडीच्या नेत्याला काही संशयास्पद खुणा दिसल्या.

▪️ त्या दिशेने तुकडी जात असताना अचानक भयानक गोळीबार सुरु झाला. त्या ठिकाणी पोलीस वीरांनी शौर्याने त्याला तोंड दिले.या लढाईत 10 शिपायांना वीर मरण आले व 9 जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता.

▪️ 13 नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर हॉट स्प्रिंग्ज येथे सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली.

▪️ त्यानंतर पाटणा येथे 1959 साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धाच्यावेळी सर्वांनी आमच्या ह्या वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिन पाळू करु़ अशी शपथ घेतली आणि तेव्हापासून सर्व राज्यातील पोलीस दले या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजित करुन त्यांना मानवंदना देतात.

▪️ दरम्यान, देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात कारवाई करताना तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून सतत जागरूकपणे आपली सेवा बजावताना, कर्तव्यात जराही कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात कायम तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणूनदेखील साजरा केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com