Ram Navmi 2023 : 30 मार्चला रामनवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Admin

Ram Navmi 2023 : 30 मार्चला रामनवमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

सगळीकडे मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते.

सगळीकडे मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. यंदा गुरुवारी ३० मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला. भगवान रामाची जयंती म्हणून देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

राम नवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवमी तारखेला भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामनवमीला रामायण आणि रामरक्षा स्तोत्राचा पाठ वाचला जातो. या दिवशी सर्व मंदिरे विशेष सजवली जातात आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते.

रामनवमी मध्यान्ह मुहूर्त सकाळी ११.११ पासून सुरु होईल आणि दुपारी १.४० वाजता समाप्त होईल. नवमी तिथी सुरुवात: २९ मार्च संध्याकाळी ७.३७ पासून, नवमी तिथी समाप्त: ३० मार्च ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. दुधाने श्रीरामाचा अभिषेक करून राम चरित मानस पठण करा,

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com