सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान भारत देशाला अखंड ठेवण्यामध्ये बहुमोलाचे आहे.

Sardar Vallabhbhai Patel Death Anniversary : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान भारत देशाला अखंड ठेवण्यामध्ये बहुमोलाचे आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली होती. मुत्सद्देगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन केली. त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सोशल मीडियावर सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार शेअर करुन अभिवादन करा.

सामायिक प्रयत्नाने आपण देशाला एका नव्या महानतेकडे नेऊ शकतो, तर एकात्मतेचा अभाव आपल्याला नव्या संकटांकडे घेऊन जातो.

- सरदार वल्लभभाई पटेल

आज आपण उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जात-पात हा भेदभाव संपवला पाहिजे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

तुमचा चांगुलपणा तुमच्या मार्गात बाधक आहे, म्हणून तुमचे डोळे क्रोधाने लाल होऊ द्या आणि कठोर हातांनी अन्यायाचा सामना करा.

सरदार वल्लभभाई पटेल

या मातीत काही तरी वेगळे आहे. अनेक अडथळे असुनही येथे महान आत्मांचा निवास राहिला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल

तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत असावी.

सरदार वल्लभभाई पटेल

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com