Video लोकशाही विशेष : आदिवासींचा भोंगऱ्या बाजार ते राजवाडी होळी

Video लोकशाही विशेष : आदिवासींचा भोंगऱ्या बाजार ते राजवाडी होळी

Published by :
Jitendra Zavar

प्रशांत जवेरी
नंदुरबार जिल्ह्य़ातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगा पांरपरिक आदिवासी होळी (adivasi holi)सण महत्वाचा असतो. यंदा कोरोनानंतर दोन वर्षांनी हा सण साजरा होत असल्यामुळे सर्वत्र होलिकात्सवाचा जल्लोष दिसून येत आहे. ७५० वर्षांपेक्षा अधिकची पंरपरा असलेल्या सातपुडय़ातील काठी संस्थानची मानाची 'राजवाडी होळी' शुक्रवारी पहाटे पेटविण्यात आली. यावेळी हजारो आदिवासींनी होळीचे (adivasi holi)दर्शन घेतले. जाणून घेऊ या नंदुरबारमध्ये कशा पद्धतीने साजरी केली जातो होळी.

आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचीत हे. या होलिकात्सोवाची तयारी १५ दिवस आधीच सुरु होते. मोठा ढोल, बासरी, शस्त्र, घुंगरी, मोरपीसांचा टोप असा साज परिधान करुन अंगावर नक्षीकाम करत आदिवासी बांधव होळी साजरी करतात. होळीचा हा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक दाखल होत असतात.

भोंगऱ्या बाजारांनी सुरुवात
भोंगऱ्या बाजार जावानशे'
'नवली लाडी लावानशे'

होळीच्या आधी होणाऱ्या खास भोंगऱ्या बाजारात जाऊया, त्या बाजारातून आपण नवी नवरी आणूया, कारण या बाजारात विवाहेच्छु आदिवासी तरूण- तरूणींची लग्नं ठरतात.

चार दिवसांपासून सातपुडय़ातील दऱ्या-खोऱ्यासह संपूर्ण जिल्ह्य़ात होळीचा ज्वर वाढला असून विविध ठिकाणच्या भोंगऱ्या बाजारांनी या होलिकात्सवाला सुरवात झाली होती. या बाजारातून आदिवासी होळीची खरेदी करतात. काठी संस्थानाच्या या राजवाडी होळीला आदिवासींमध्ये विशेष महत्व आहे. होळीत वापरली जाणारी उंच काठी गुजरातच्या जंगलातून आणण्यात आली होती. या ठिकाणी राजा उमेदसिंग यांची गादी आणि त्यांच्या शस्त्रांच्या पूजनानंतर ढोल आणि बिरीच्या तालावर आदिवासी नृत्यांनी सातपुडा गजबजून गेला. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही मानाची काठीची राजवाडी होळी पेटविण्यात आली. काठी प्रमाणेच असली, रोझवा पुनर्वसन, जावदा वसाहत आणि वडछील वसाहतीतही राजवाडी आदिवासी होळीचा उत्सव साजरा करण्यात आला…

विनोदी कवी विष्णू सुरासे यांच्या नजरेतून होळी, पाहा व्हिडिओ

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com