Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जयंतीला द्या 'या' खास शुभेच्छा

Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जयंतीला द्या 'या' खास शुभेच्छा

गोपाळकाला म्हणजे आध्यात्मिकता, सामाजिकता, एकता आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवणारा सण. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून याच दिवशी कृष्णजन्माष्टमी साजरी केली जाते.
Published by :
Team Lokshahi

Krishna Janmashtami 2023: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात. या श्रीकृष्ण जन्माष्टमीला आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश.

लोणी, खडीसाखरेचा नैवेद्य

गोपाळकाला घेऊनी जाई भक्त.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा"

दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,

तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,

सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

"राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी

लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास

सर्व मिळून साजरा करू

गोकुळाष्टमी चा दिवस खास.

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा"

"ढगांच्या आडून चंद्र हासला,

आकाशी ताऱ्यांचा रास रंगला,

कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,

पावसाचा सुगंधआणि

आली राधा-कृष्ण याच्या

प्रेमाची बहर

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com