आज महापरिनिर्वाण दिन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आज महापरिनिर्वाण दिन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रम असल्यानं बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅनडा, अर्जेंटिना,दक्षिण कोरिया,आणि श्रीलंका या देशांचे प्रतिनिधी या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थानिक झाले त्यामुळे त्यांचे बालपण सातारा येथे गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय न्यायशास्त्रज्ञ तत्वज्ञ, समाजसुधारक होते. भारतीय राज्यघटनेचे राजकारणी शिल्पकार होते. त्यांनी दलित चळवळ उभी केली. त्या काळात दलित लोकाना अस्पृश्य समजले जायचे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता इतकेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता अशा लोकाना तुच्छतेची वागणूक दिली जायची.

डॉ. आंबेडकरानी जातीभेद, अन्यायाविरूद लढा दिला. नागरिकांना त्यांचे मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला, त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडीलांचे नाव 'रामजी' व आईचे नाव 'भीमाबाई' असे होते. डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव 'भीमराव रामजी आंबेडकर' असे होते. ते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते. त्यांना शाळेत प्रवेश देण्यास नकार मिळाला कारण ते दलित समाजाचे होते वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिक्षण घ्यावे लागले ते अत्यंत अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांच्या बालपणी त्यांना मिळालेली तुच्छतेची वागणूक ही अन्याया विरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली. सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर त्यांनी शिक्षण पूर्ण केले. हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मुलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च-नीच भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा. सत्याग्रह, संविधान अशी महान कार्ये केली. ६ डिसेंबर १९५६ साली त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com