Vinayak Chaturthi 2024: आज नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त

Vinayak Chaturthi 2024: आज नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी; जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त

हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनिय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकंष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे.
Published by :
Team Lokshahi

हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनिय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकंष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार, चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक शुक्ल पक्षात, तर दूसरी कृष्ण पक्षात. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्यानुसार विनायक चतुर्थीची तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया.

पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.59 पासून सुरू होत आहे. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:59 वाजता संपेल. अशा परिस्थितीत 2024 सालची पहिली विनायक चतुर्थी 14 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत

1. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून श्रीगणेशाची पूजा करावी व त्याची पूजा करण्याचा संकल्प करावा.

2. श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून जलाभिषेक करावा.

3. श्रीगणेशाला चंदनाचा तिलक लावावा, वस्त्र, कुंकू, धूप, दिवा, अखंड लाल फुले, सुपारी, विड्याचे पान इत्यादी अर्पण करा.

4. गणपतीला मोदक आणि दुर्वा खूप आवडतात असं म्हणतात.

5.अशा स्थितीत त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अवश्य दाखवावा.

विनायक चतुर्थीला करा 'हे' उपाय

1. कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी उंदरावर बसलेल्या गणेशाची मूर्ती किंवा फोटोची पूजा करा. याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

2. गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत. अशा स्थितीत कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा. यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

3. गणपतीला मोदकाशिवाय दुर्वाही आवडतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी “इदं दुर्वदलं ओम गं गणपतये नमः” या मंत्राने गणपतीला दुर्वा 5 किंवा 21 संख्येत अर्पण करा.

4. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी गणपतीला शेंदूर वाहा. स्वतःच्या कपाळालाही लावा.

5. या दिवशी पूजा करताना श्रीगणेशाला शमीची पाने अर्पण करा. यामुळे श्रीगणेश प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com