आज जागतिक रंगभूमी दिन; जाणून घ्या इतिहास
Admin

आज जागतिक रंगभूमी दिन; जाणून घ्या इतिहास

आज जागतिक रंगभूमी दिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज जागतिक रंगभूमी दिन आहे. हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. आजपासून बरोबर 62 वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला.

विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला.इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित केली जाते.

2002 मध्ये भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला संदेश देण्याचा मान मिळाला होता. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. कलाकार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे प्रेक्षकांना आवडतं.

रंगभूमीच्या इतिहासापासून ते आजची रंगभूमी, मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटके, त्यांच्या मर्यादा, प्रेक्षकांची मनोभूमिका या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन करणे काळाजी गरज आहे. विष्णूदास भावे यांच्या काळातील नाटके, ज्येष्ठ नाटककार खाडीलकर, देवल, कोल्हटकर, गडकरी यांनी लिहिलेली नाटके यांचा परीचय आजच्या पिढीला करून दिले पाहिजे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगताना १८४३पूर्वी रंगभूमी होती आणि तेव्हापासून व्यावसायिक रंगभूमी कशी अस्तित्वात आली हे लक्षात घेतले पाहिजे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com