आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज उपवास 12 नोव्हेंबरला केला जाणार.

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. या महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज उपवास 12 नोव्हेंबरला केला जाणार. या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा करुन उपवास केला जातो. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. तसेच गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी मनोभावे उपवास देखील करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उपवास सोडला जातो. मात्र उपवास सोडण्यापूर्वी रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावरच व्रत मोडते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 8.21 वाजता चंद्र दिसणार आहे.

मुहूर्त

11 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 08.17 वाजता चतुर्थी तिथी सुरू होईल.

ही तारीख 12 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 10.25 वाजता संपेल.

या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:21

Lokshahi Marathi
www.lokshahi.com