Vinayak Chaturthi 2024: विनायक चतुर्थीनिमित्त पूजा करण्याची शुभ वेळ कोणती? जाणून घ्या महत्त्व

Vinayak Chaturthi 2024: विनायक चतुर्थीनिमित्त पूजा करण्याची शुभ वेळ कोणती? जाणून घ्या महत्त्व

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत पाळला जातो.
Published by :
Dhanshree Shintre

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत पाळाला जातो. समस्या आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी उपवास ठेवा आणि श्रीगणेशाची पूजा करावी. चैत्र विनायक चतुर्थी शुक्रवार, 12 एप्रिल 2024 रोजी आहे.

हिंदू धर्मात गणेशाला शुभ आणि अडथळे दूर करणारे मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी गणेशाची पूजा करणाऱ्यांना ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्यानुसार विनायक चतुर्थीची तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया.

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 11 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3:03 पासून सुरू होत आहे. 12 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1:11 वाजता संपणार आहे. त्यामुळे पूजेची वेळ 12 एप्रिल 2024 ला सकाळी 11.05 दुपारी 1.11 असणार आहे.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत

1. विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून गणेशजीची पूजा करावी.

2. श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून जलाभिषेक करावा. तसेच दिवसभर व्रत ठेवावा.

3. श्रीगणेशाला चंदनाचा तिलक लावावा, वस्त्र, कुंकू, धूप, दिवा, अखंड लाल फुले, सुपारी, विड्याचे पान इत्यादी अर्पण करा.

4. श्रीगणेशाला दूर्वाची 21 गांठ ”इदं दुर्वादलं ऊं गं गणपतये नमः” मंत्र बोलूत अर्पित करा.

5. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य अवश्य दाखवावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com