नव्या संसद भवनात ठेवण्यात येणारा सेंगोल म्हणजे नक्की आहे तरी काय? वाचा सविस्तर

नव्या संसद भवनात ठेवण्यात येणारा सेंगोल म्हणजे नक्की आहे तरी काय? वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मेला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मेला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यात विशेष गोष्ट आहे ती म्हणजे सेंगोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सेंगोल नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

आता सेंगोल म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सेंगोल म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आणि चोल सम्राज्याची परंपरा आणि सत्ताहस्तांतराच्या इतिहासाची साक्ष देणारा हा सेंगोल आहे. सेंगोल म्हणजे राजदंड. सत्ताहस्तांतरावेळी हा राजदंड दिला जायचा.1300 वर्षे जुनी असलेल्या चोल साम्राज्याच्या परंपरेचा सेंगोल हा महत्वाचा घटक आहे.

भारताच्या सत्तांतरात इंग्रजांकडून पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याकडे देशाची सूत्र देण्यात आली. तेव्हा या सत्तांतराचं प्रतिक म्हणून संगोल देण्यात आलं. हा पूर्णपणे सोन्याचा राजदंड आहे. 1947 मध्ये पाच फुटांचा हा राजदंड तयार करण्यात आला. सेंगोल हा राजदंड दक्षिणेतील चोल साम्राज्याच्या परंपरेचं प्रतिक आहे. आणि तो आता नव्या संसद भवनात ठेवण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com