गणपतीला वाहण्यात येणाऱ्या पत्रींचे आयुर्वेदीक महत्व काय?

गणपतीला वाहण्यात येणाऱ्या पत्रींचे आयुर्वेदीक महत्व काय?

गणेश चतुर्थीला पूजेच्या वेळी प्रतिष्ठापनेसाठी २१ पत्री वाहण्याची प्रथा आहे. फळे, फुले, औषधे, लाकूड, वनस्पतींमुळे मिळतात. या आपल्याला नैसर्गिक खजिना बहाल करणाऱ्या झाडांजवळ जाऊन त्यांना स्पर्श करावा, त्यांची ओळख व्हावी यासाठी पूजेत त्यांची पूर्वजांनी आवर्जून योजना केलेली आहे.२१ पत्री, २१ दुर्वा, विविध फळे आणि नैवेद्याचं ताट असं सारं काही गणपतीच्या आवडीचं या दिवसांमध्ये केलं जातं.
Published by :
Siddhi Naringrekar

दुर्वा – शीतल, रक्तस्कंधन, व्रणरोपण, मूत्रजनन, जखमेवर पानांचा लेप केल्यास रक्त वाहणे बंद होते. घोणा फुटल्यावर नाकात अंगरस घालतात. नागिणीवर दूर्वा वाटून लावतात व रस पोटात देतात. दाह कमी होतो. उष्णतेने शमन करणारी दूर्वा ही प्रमुख वनस्पती आहे.

बेल : याच्या कवठासारख्या दिसणाऱ्या फळात प्रोटिन, कर्बोदके व जीवनसत्त्वे असतात. पोट बिघडल्यावर औषध म्हणून बेलाचा वापर होतो.

पिंपळ – अहोरात्र प्राणवायू देणारे वृक्ष. याचा प्रत्येक भाग औषधी आहे. पिंपळ बुद्धिवर्धक, रक्तशुद्धीकारक तसेच त्वचा, पोट व दंतविकारावर गुणकारी आहे. पिकलेली फळे खाल्ल्याने तोतरेपणा जातो.

शमी : विजयादशमीला सोनं म्हणून वाटली जाणारी द्विदल पाने. कीटकदंशावर उपयुक्त.खैरासारखा बारीक पानाचा काटेरी वृक्ष राजस्थान व गुजरातच्या काही भागात कल्पवृक्ष समजला जातो. शरीरातील उष्णतेचा नाश करतो.

तुळस – घरगुती उपचारात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या सौम्य, ज्वरघ्न, शीतहर, वातहर, कफघ्न, उत्तेजक व वायूनाशी असे धर्म आहेत. दुखणाऱ्या कानात तुळशीचा रस घालतात. पाने उष्ण धर्माची मात्र बी शीतकारक आहे. तुळशीची माती कीटकदंशावर उपयुक्त आहे.

आघाडा – आघाडा हा स्त्रियांच्या रोगावर विशेष उपयुक्त असतो. श्रावणात जिवतीला यासाठीच पाने वाहतात. पंचांगांचे क्षार विषनाशक आहेत.

धोत्रा – यात काळा-पांढरा व राजधोत्रा असे तीन प्रकार आहेत. धोत्रा विषारी असतो. पांढरा धोत्रा पूजेत वापरतात. दमा, आकडी, फुफ्फुसाच्या नळ्या सुजणे, स्नायूंचे झटके यावर गुणकारी. धोत्र्याची पाने व खोड वाळवून नाकाने धूर घेतल्यास दम्यात आराम पडतो.

माका - पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी उगवतो. समोरासमोर पाने देठविरहित, छोटी पांढरी फुले, दिसायला सूर्यफुलासारखी. ही उष्ण वनस्पती आहे.

डोरली – दशमुळातील पाच लघू वनस्पतीतील एक वनस्पती. रक्तवाहिन्या ज्ञानतंतू, मूत्रपिंड अशा अनेक घटकांवर उपयोगी.

डाळींब : डाळिंबाच्या दाण्यात निम्मा रस व निम्मा चोथा असल्याने पोट साफ राहते. पाचक, कृमीनाशक, थंडावा देणारे.

मालती – याचा मुखरोगावर अत्यंत उपयोग होतो.

केवडा – पाने, फुले व मुळांच्या पारंब्या औषधात वापरतात. केवडय़ाच्या फुलांच्या पानात काथ महिनाभर बांधून ठेवतात व नंतर त्याच्या गोळ्या करतात. या गोळ्या तोंडात ठेवल्याने मुखदरुगधी व आंबट पाणी घशाशी येणे कमी होते.

मरवा – अतिशय सुगंधी, मनोहारी व वर्षांयू, फूटभर उंचीचे व याचे पंचांग व भस्म औषधात वापरतात. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची जी काही हार्मोन्स असतात

रुई – याचा चीक विषारी असतो. त्वचेला लागल्यास फार दाह होतो व फोड येऊ शकतात. काटा मोडल्यास तळपायाला पानांचा चीक लावल्यास काटा निघतो.

बोर – भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते. आवळा, पेरू व नंतर बोराचा नंबर लागतो. यात कॅल्शियम, फॉस्फरस व लोह हे अधिक प्रमाणात असते. साल, पाने व फळे आणि बिया औषधात वापरतात.

केवडा – पाने, फुले व मुळांच्या पारंब्या औषधात वापरतात. केवडय़ाच्या फुलांच्या पानात काथ महिनाभर बांधून ठेवतात व नंतर त्याच्या गोळ्या करतात. या गोळ्या तोंडात ठेवल्याने मुखदरुगधी व आंबट पाणी घशाशी येणे कमी होते.

जाई– बऱ्या न होणाऱ्या व्रणांवर, जखमेवर जाई उपयुक्त आहे. जाईच्या पानांच्या काढय़ाने जखम धुवून त्यावर वाटलेली पाने लावली असता जखम बरी होते, तोंड आलेले बरे होते.

शंखपुष्पी, विष्णुकांत – गोकर्ण प्रकारातील वनस्पती ज्यांची फुले शंखाच्या आकाराची असतात. बुद्धिवर्धक

अगस्ती – या वनस्पतीचे अनेक उपयोग आहेत. जमीन सुपीक करणे, गुरांचे दूध वाढवणे, मानवाला पोषक आहार देणे. याची पाने, फुले व शेंगा वापरतात.

अर्जुन – बलिष्ठ वृक्ष, पाण्याजवळ येतो. यास पांढरा ऐन असेही म्हणतात. हृदयपोषक गुण यामध्ये असतात. हृदयबल देणारे अर्जुनारिष्ट यापासून करतात. नैसर्गिक कॅल्शियम यात मुबलक प्रमाणात असते.

गणपतीला वाहण्यात येणाऱ्या पत्रींचे आयुर्वेदीक महत्व काय?
गणेश चतुर्थी स्पेशल :‘विदर्भातील अष्टविनायक’, आवर्जून भेट द्या
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com