Solar Eclipse 2023: शेवटचे सूर्यग्रहण कुठे, कसा व केव्हा पाहाल?

Solar Eclipse 2023: शेवटचे सूर्यग्रहण कुठे, कसा व केव्हा पाहाल?

14 ऑक्टोबरचे हे ग्रहण या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असेल. या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. या सूर्यग्रहणाची वेळ आणि हे सूर्यग्रहण कुठे दिसणार, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ.
Published by :
Team Lokshahi

Surya Grahan 2023 : खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना खूप खास आहे. कारण- या महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही घटना होणार आहेत. 14 ऑक्टोबर रोजी पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण; तर 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण आहे. 14 ऑक्टोबरचे हे ग्रहण या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असेल. या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एकाच सरळ रेषेत येतात आणि चंद्रामुळे सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्यग्रहण लागतं. तुम्हाला माहीत असेल की, सूर्यग्रहणाचे खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती, असे तीन प्रकार आहेत.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य चंद्रामुळे पूर्णपणे झाकला जात नाही. बांगडीसारखी सूर्याची कडी (Ring of Fire) दिसून येते. त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’, असे म्हणतात.

सूर्यग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री 8:34 ला सुरू होईल आणि पहाटे 2:25 ला समाप्त होईल.

हे सूर्यग्रहण कुठे दिसणार?

हे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-पश्चिम युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक व आर्क्टिक प्रदेशांसह अनेक भागांमधून पाहता येईल. त्याशिवाय इतर पाश्चात्त्य देशांमधूनही सूर्यग्रहणाचा काही भाग पाहता येईल. भारतात मात्र हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही.

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी फिल्टर लावलेले चष्मे वापरण्याचा सल्ला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com