World Malaria Day 2024: जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो आणि केव्हा सुरु झाला? जाणून घ्या इतिहास

World Malaria Day 2024: जागतिक मलेरिया दिन का साजरा केला जातो आणि केव्हा सुरु झाला? जाणून घ्या इतिहास

आज २५ एप्रिल रोजी जागतिक 'मलेरिया दिन' साजरा केला जात आहे. मलेरिया हा एक जीवघेणा आजार आहे
Published by :
Dhanshree Shintre

आज २५ एप्रिल रोजी जागतिक 'मलेरिया दिन' साजरा केला जात आहे. मलेरिया हा एक जीवघेणा आजार आहे. हा आजार संक्रमित मादी अ‍ॅनोफिलीस डासांच्या चावल्याने होतो. पाऊस किंवा वातावरणातील आर्द्रता यामुळे मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होऊ लागते आणि रोगराई पसरते. मलेरियाची काही सामान्य लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, उलट्या, थंडी वाजून येणे, थकवा, चक्कर येणे आणि पोटदुखी. मलेरियाच्या उपचारात साधारणपणे दोन आठवडे औषधे घ्यावी लागतात. त्याच वेळी, रोगाकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. भारतात दरवर्षी मलेरियाचे हजारो रुग्ण आढळतात आणि मलेरियामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. मलेरियाचे गांभीर्य आणि ते कसे टाळावे याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मलेरिया दिन जागतिक स्तरावर साजरा केला जातो. मलेरिया डे केव्हा आणि कुठे सुरू झाला ते जाणून घेऊया.

जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस 2007 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. आफ्रिकन देशांमध्ये पहिल्यांदा मलेरिया दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आफ्रिकन देशांमध्ये मलेरिया हे मृत्यूचे एक कारण होते आणि या मृत्यूंची आकडेवारी कमी करण्याच्या उद्देशाने जागतिक मलेरिया दिन सुरू करण्यात आला.

2007 साली जागतिक आरोग्य संघटनेने एका बैठकीत हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली, जेणेकरून लोकांचे लक्ष या धोकादायक आजाराकडे वेधले जावे आणि मलेरियाबाबत लोकांना जागरूक करता येईल. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना मलेरिया दिनाच्या विशेष थीमवर कार्यक्रम आयोजित करते. या वर्षी मलेरिया दिन 2024 ची थीम 'रेडी टू कॉम्बॅट मलेरिया' माय हेल्थ, माय राईट मलेरिया प्रतिबंध, निदान आणि उपचार सेवांमध्ये कायम असलेल्या तीव्र विषमतेवर तोडगा काढण्याची तातडीची गरज अधोरेखित करते," असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत वेबसाइटवर दक्षिण-पूर्व आशियासाठी डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक सायमा वाजेद यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com