जागतिक एड्स दिन २०२१ | AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल?

जागतिक एड्स दिन २०२१ | AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल?

Published by :

जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो.

ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.

  • एड्स होण्याची मुख्य कारणे
  • HIV / AIDS रुग्णाचे रक्त दुसऱ्या रूग्णाला दिल्याने एड्स
  • एड्स आजाराविषयी गैरसमज
  • HIV / AIDS या असाध्य, अपरिचित असा रोग असल्याने चुकीचे गैरसमज बाळगणे हे सुद्धा समाजाच्या दुष्टीने घातक आहे.

एचआयव्ही आणि एड्समध्ये फरक काय?

एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. हा थेट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या टी सेल्सवर हल्ला करतो. तर एड्स ( Acquired Immunodeficiency Syndrome) एक मेडिकल सिंड्रोम आहे. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर सिंड्रोम बनतो. एचआयव्हीची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. परंतु, एड्सचा संसर्ग होत नाही.

एचआयव्हीपासून बचाव कसा कराल?
एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com