Zeenat Aman Birthday: झीनत अमान वयाच्या 19 व्या वर्षी बनली मिस एशिया पॅसिफिक; जाणून घ्या त्यांच्याविषयी

Zeenat Aman Birthday: झीनत अमान वयाच्या 19 व्या वर्षी बनली मिस एशिया पॅसिफिक; जाणून घ्या त्यांच्याविषयी

झीनत अमान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील 70 च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Published by  :
Team Lokshahi

झीनत अमान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील 70 च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. झीनत अमान आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत . झीनत अमानचा जन्म 19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अमानतुल्ला खान होते. झीनत अमानने 70-80 च्या दशकात लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले होते. झीनत अमान तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड पात्रांसाठी आणि पोशाखांसाठी जास्त ओळखली जाते.

खरं तर, जेव्हा झीनत अमानने सिनेजगतात प्रवेश केला तेव्हा अभिनेत्री फक्त साडी आणि सूट परिधान करत असे. पण झीनत अमानने तिच्या एन्ट्रीने सिनेमाचं वातावरणच बदलून टाकलं. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात झीनत अमानने पांढऱ्या साडीत खूप बोल्ड सीन्स दिले होते. त्यावेळी झीनत ही पहिली अभिनेत्री होती जी वेस्टर्न ड्रेस आणि बिकिनीमध्ये दिसली होती. झीनत अमान आणि देवानंदची ऑन-स्क्रीन जोडी लोकांना खूप आवडली. झीनतने अजनबी, हीरा पन्ना, वॉरंट, कलाबाज, रोटी कपडा और मकान, धरम वीर, हम किसी से कम नहीं, डॉन, पुकार, लावरिस आणि दोस्ताना यांसारखे उत्कृष्ट चित्रपट केले आहेत.

झीनत अमानने बालकलाकार म्हणूनही काम केले आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या झीनतला लहानपणापासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या 19 व्या वर्षी, झीनत अमान 1970 मध्ये मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल खिताब जिंकणारी पहिली भारतीय ठरली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com