Anita Alvarez Fainted
Anita Alvarez FaintedTeam Lokshahi

Anita Alvarez Fainted : जलतरणपटू पोहोताना पडली बेशुद्ध अन्...

सध्या जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा सुरुआहे आणि या स्पर्धेत एक धक्कादायक गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले.
Published by :
shweta walge

सध्या जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा (Swimming Championship) सुरुआहे आणि या स्पर्धेत एक धक्कादायक गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये अमेरिकन जलतरणपटू अनिता अल्वारेझ (Anita Alvarez) ही बुडापेस्टमधील 2022 फिना वर्ल्ड अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये (World Aquatic Championships) पूलमध्ये उडी मारताना अचानक बेशुद्ध पडली आणि ती तलावाच्या तळाला गेल्याचे पाहायला मिळाले.

जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा सुरु असताना 25 वर्षीय अनिता ही एकेरी प्रकारात सहभागी झाली होती. या प्रकारात सहभागी होण्यासाठी ती जलतरण तलावात उतरली आणि पोहायला लागली. पण पोहचाताना अचानक ती बेशुद्ध पडल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर स्टेडियममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहीतरी घडल्याचे लक्षात येताच प्रशिक्षक अँड्रिया फ्युएन्टेस (Andrea Fuentes) यांनी ताबडतोब तलावात उडी घेतली आणि जलतरणपटूला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या प्रयत्यांमध्ये त्यांना यश आले आणि त्यानंतर त्वरीत अनिताला उपचारासाठी नेण्यात आले. सध्याच्या घडीला अनितावर उपाचर सुरु आहेत आणि तिची प्रकृती ही आता सुधारत असल्याचे अमेरिकेच्या जलतरण संघटनेने स्पष्ट केले आहे.

अल्वारेझला वाचवल्यानंतर तिच्या प्रशिक्षकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, 'अनिताचा सिंगल खूप चांगला होता. ही तीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. तिने लिहिले की, सराव करताना ती खूप थकली होती, त्यामुळे ती पूलमध्ये उडी मारल्यानंतर बेशुद्ध पडली.

Anita Alvarez Fainted
बीसीसीआयने 'या' अंपायरवर घातली होती बंदी, आता बाजारात विकतात शूज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com